Description
पोलिसांची जीवनपद्धती
जे शरीराने आणि मनाने सक्षम असतात तेच पोलिस यंत्रणेमध्ये राहून कार्य करण्यास पात्र होतात. यासाठी या करीयरच्या सुरुवातीलाच खास ट्रेनिंग देण्यासाठी विशिष्ठ कालावधीचे नियोजन केलेले असते. वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यायामामधून आरोग्य आणि सक्षमता विकसित केली जाते.
मात्र एकदा करियर सुरु झाले की, तोच व्यायाम करण्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध होत नसतो. कारण आता प्रत्यक्ष कार्यासाठी बराचसा वेळ द्यावा लागतो.
पोलिसांचे काम एखाद्या कंपनीतल्या लोकांसारखे ठराविक वेळेचे बंधन पाळणारे नसते. सकाळी ९ वाजता यावे आणि ५ वाजता ड्युटी संपली असे म्हणून घरी निघावे अशी परिस्थिती नसते. पोलिसांचे काम अचानक कुठल्याही वेळी येऊ शकते. मग ते रात्री दोन वाजलेले असतील किंवा सकाळचे सात किंवा संध्याकाळचे सात वाजलेले असतील, त्यांना पटकन कामासाठी तयार व्हावेच लागते. आत्ता माझी ड्युटी संपलेली आहे असे म्हणण्याची सोयच नसते.

Reviews
There are no reviews yet.